मेरे भीतर

ये कौन है, जो मुझसे कहता है
सब ठीक हो जाऎगा
अच्छा. सब अच्छाही...

और ये कौन?
जो मुझे दिखाता है...
के अब सब कुछ खत्म हो गया है
सब कुछ
सारे अरमान... सारी खुशीयां...

श्वेत चादर में लिपट...
और मैं मातम में
हाय रे
कौन यह,
जो मुझे बताता है
बावजूद इसके
ऎसे ऎसे करना होगा
ऎसे ऎसे जीना होगा...

कौन है यह?
जो बिलख बिलख कर रोये जा रहा है,
रोए जा रहा है...
ऎसे क्या टुट गया है
ऎसे क्या छुट गया...

कौन है ये सब मेरे भीतर,
भीतर ही भीतर
ये किसका तल, अतल, अंतरतल...

और ये कौन?
जो अभी भी उसकी आगोश पडा हुआ है...
__________________________

विखुरलेल्या ओळींची काहाणी...

घर
मला माहीत
आता दारावर बेल वाजेल...
मग:
आवरायला हवं न घर
मनाचं... शरिराचं...

वर्दी
कधीतरी मनाच्या त्या एका कोपर्‍यात
श्वासांची खूप धावपळ सुरु असते,
कोणाची बरं वर्दी असते ही...

उणे.. अधिक एक तिकडे
माझ्या दोन ठोक्यांमधला एक ठोका चुकतो आहे
तिकडे त्याच्या हृदयाचे ठोके वाढताहेत...

फिनीक्स
रोज कितीतरी स्वप्नांची होळी,
होरपळून जीवाची राखराख होतेय.
पण राखेत जगतांना स्वप्नांना
पुन: पंख फुटतात आणि नव्याने ते
तेजाकडे झेपावतात...

फू...
कस सांगू तुला
एक एक दिवस
कसा सरतो
ज्वालामुखीच्या अंगणाला
सारवता सारवता पोळतो

दवडी
उगाच दवडला वेळ
झाकून होती
तरी दवडी रिकामी

मावळत नाहीस
हातात तोडे घातले
पायात जोडवी
नाकात भली मोठी नथ तरी...
श्वासाच्या एका अंतरावर तू
उभा असल्याचं जाणवतं...

नवस
वर लाल रंगाचा चुडा
खाली रक्ताळलेले कुंकू
रक्ताळलेल्या भावनांचे
रक्ताळलेले नवस...

एक दिन
संपूर्ण पानांचं ओझ उतरवून
फक्त आणि फक्त
फुलांनी बहरावं असं झाड
होता यावं ना एक दिन

रसिया
प्रत्येक ऋतूची एक सारखी आठवण
तू त्या ऋतूतही बोलला नाहीस
तू या ऋतूतही अबोल आहेस...रसिया

बेसबब
बारीश की ठिठूरती ठंड से
गिरते पिले पत्ते
बेसबब तुम्हारी याद...
बेबस बिखरे पत्तो तले
दबी हुई है बिखरी सांस......
__________________________

एक परिघ...

12:35 by Unknown 0 comments
तो-
...ती दिसायची कायम स्व:तच मशगूल
तिचं असं स्वत: गुंतून राहणं
फार अस्वस्थ करायच मनाला
तिने आपल्याशी बोलावं, आपल्याकडे बघावं,
आपल्यासोबत...
केवढा अट्टहास, केवढा आकांत
या मनाचा त्या मनासाठी
आणि ती मात्र मौन
कमालीची मौन...
खरंतरं तिला ओढायच्या नादात
गच्च ओले कपडे वाळू घातलेल्या दोरीगत
तुटल्या गेलो आपण
आणि सगळी शुभ्रताच हरवली...
किती दिवस, किती रात्र...
किती विनवन्या, किती माफी, किती मनधरणी...
----------

ती-
...आपण कायम आपल्या जागेच्या,
आपल्या जगाच्या शोधात... काय चुकलं??
...
खरंतरं जीवावर आलं होतं निघायला
पण आज नाहीच द्यावासा वाटला नकार
इतक्यांदा नकार दिलाय
आज एका नकारानं दुसर्‍या नकाराला
स्वीकारावं म्हटलं...
तर सालं इथेही जागेचा प्रश्न...
दिसतेय सगळ्या जागा भरल्यात
अगदी आपल्यासाठी राखून ठेवलेली सुध्दा...
...
हुश्श एक जागा रिकामी करुन बसले
पण बोध अपराध अरे रेsss
...
जागा नसल्याची, जागा न मिळल्याची खंत
अजूनही जागी; जागच्या जागी...
----------

आणि तो (त्याचा वयात आलेला मुलगा)
...अरे हीच ती अगदी बाजूलाच बसलीय
हातात पप्पांच पुस्तक
किती कुरवाळतेय त्या पुस्तकाला
त्यालाही असंच कुरवाळलं असतं...???
किती झुरला तो हिच्यासाठी
रात्र रात्र रडला
मला नव्हतंच कळलं काही...
काय सांगणार होतो???
मी फक्त एकूण घेतलं
जसं सांगेल तसं, तितकं, तेवढच
आणि तो शांत झाला
हीनेही ऎकून घेतले असते तर...
----------

समारंभा शेवटी
त्याचा हातात हात घेऊन
ती- अभिनंदन सर...

तो- ...
(अजूनही मनातल्या मनातच)

आणि तो (त्याचा वयात आलेला मुलगा)
...
आता परत यांच्या रात्री माझ्या रात्रीला बिलगून...
__________________________

मौनाच भाषांतर...

12:34 by Unknown 0 comments
तू कधीतरी विचारशील म्हणून
उत्तरांची तयारी करतेय...

तु विचारशील
- कशी आहेस?
तर सांगेन
तुझ्या शिवाय कशी राहील?

तु विचारशील
- कुठे आहेस?
तर सांगेन
तुझ्यापासून खुssप दूर...

तु विचारशील
- काय करतेस?
तर सांगेन
गणित सोडवतेय... हल्ली सुत्र मांडून
दोन बोटांमधील आकडेवारीने
बरीच गणित चुकलीत माझी...

जिव्हारी लागेल.

मग काहीश्या काळजीने म्हणशील
- काळजी घे!!!
मी तुझं उत्तर तुलाच परत करेन
काळजी घेतल्याने काय होईल?
............................................
त्यानंतरचा संवाद श्वासांचा.
श्वासांचा अर्थ कळतो
शब्दांचे अर्थ सलतात
म्हणून मग
श्वासा-श्वासातील अंतर मिटेपर्यंत
तुझे माझे मौन...

__________________________

कालपासनं माझा पत्ता नाहीये...

12:33 by Unknown 0 comments
एखादं रात्री मन शरीर सोडून निघून जातं
दूसर्‍या दिवशी फक्त श्वासच उठतो
त्यामागे मनाचं मंतरलेपण नसतं
एक शरीर घरभर फिरत असतं
या त्या वस्तुशी धडपडत
धडधड करीत...
त्याच्या ओळखीचं, त्याच्या सरावाचं
काहीच नाही
त्यामुळे ते पडतं, पहुडतं
आखूड लांब श्चास घेतं...
त्याला कोणत्याच कामाशी काही देण-घेण नसतं
बदलेल्या नजरांशी
कपाळावरील आठ्यांशी
कशाशी काही म्हणून नाही
त्याला फक्त जिवंत ठेवायच असतं बस!!!
निकराने जिवाला हवा पुरवायची
एकसारख पंपीग...
उर धपापतोय धापा टाकतोय
पण काय होतेय सांगता येत नाही
...............................
एक ओळखीचा आवाज
येतोय म्हणणारा
आल्यावर अलगद मिठीत घेणारा
आणि म्हणानारा
आज तू नाहीसच

हो कालपासन माझा पत्ता नाहीये...
__________________________

एक कलीग...

12:31 by Unknown 0 comments
तिला जेव्हा माझ्याशी
बोलायचं असते
तेव्हा खरंतरं
तिच्या मनात ’तो’ असतो
त्याच्याविषयी
मला काही सांगायचं असते
बोलायचं असते
विचारायचं असते
पण मग स्वत:वरच
रुष्ठ होऊन ती
जाणिवपुर्वक
व्यक्तींची, वस्तूंची माहिती
देत बसते...

-बेल वाजली की,
त्याच्या म्हणून फोन जवळ घेते...
...मॅसेज आला असेल म्हणूनही...
स्क्रीन वरील त्याच्या नसलेल्या
टोपन नावाला कुरवाळत बसते

दिवसातून कितीतरीदा
या फोनच्या स्क्रीनवर
त्याचा फोटो असावा,
त्याचा नंबर त्याचाच
नावाने सेव्ह असावा
असा काहीबाही
विचार करीत...

कॉम्प्युटरवर त्याचे मेल
त्याचा फोटो जपून ठेवलेला
कोणाची चाहूल नसेल
अशा वेळी मन भरून...
उचंबळून रिती होत
की-बोर्डवर
माऊस हातात घेऊन...
परत एक छानशी स्माईल डकवून
कामावर रूजू

एक वेळा तिने विचारलं
होतं म्हणे त्याला
तू नाही का रे व्याकूळ होत माझ्यासाठी
उत्तरदाखलं तिने तिचं जपून
ठेवलेलं हरवलेपण...

तिच्या मनात सतत घालमेल
सुरू असते
ती पीर, बाबा, दर्ग्यावर
आपल्याया न्याय मिळावा म्हणून
गुहार करते
न्याय कोणा पासून कसा...?
कळत नाही
पण तिला तिचा खेळ काही मांडता येत नाही

आजही भेटली
बोलली
खळाळून हसली
आजही तिच्या नजरेतला तो
पापण्यात होता...
तिच्या जिकरीच्या प्रयत्नात
आजही ती
यशस्वी झाली होती
खाली कवितेतून मात्र ओथंबून वाहात होती...
__________________________

बाया

12:30 by Unknown 0 comments
काही बाया कायम ओलत्या
बोटं रुतवलं तर पाणी उमटावं अश्या...

काही बाया अगदीच शुष्क
जसा पानावलेल्या छातीवरील पदर कोरडा...

काही बाया राठ, राकट...
अंगाच्या रंगानी अधिकाधीक गडद होत जाणार्‍या...

काही बाया बायाच
इतरां पेक्षा बर्‍या म्हणून उन-उन सहानुभूती घेणार्‍या...

काही बाया वडील चेहर्‍याचा
घरी दारी वडील होत जाणार्‍या...

काही बाईपणाच्या ताबुतातून
बाहेर पडलेल्या
स्वत:ला सोलून काढत

नवतीच्या मोहर्रम मधे शामील होत असलेल्या...
बाया
__________________________