नक्टी मेली...

सुकलेल्या चेहर्‍यावरील
ओलं नाक
ताज्या मातीचं..
डकवतांना
जरास ओघळलेलं...

अपूरं लुगडं घट्ट..
घोट्याच्या वर,
कमरेला खोचलेलं...

पिवळ्या
गरसोळीच्या मापात
समोरुन खाली
उतरलेलं ब्लाऊज
जेरबंद...

पाण्याचा ट्रे घेऊन
ती वरमाय समोर...
आणि मागे बसलेल्यांन पुढे
खाली वाकून जरा अदबीने
पाणी देत...

तशी नवरीची आजी
डोक्यावरील पदर
तोंडा्शी घेत
तिच्या विश्वासूच्या
कानाला लागत

- हीला आत
पाठवू नकोस
सारखी त्या बायांच्या
गळ्याकडे पाहाते
आणि बापे हिच्या...
नक्टी मेली...
__________________________

1 Response to "नक्टी मेली..."

  1. Unknown Says:

    नक्टी मेली...
    महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१३ मधे प्रकाशीत

Post a Comment