विखुरलेल्या ओळींची काहाणी...

घर
मला माहीत
आता दारावर बेल वाजेल...
मग:
आवरायला हवं न घर
मनाचं... शरिराचं...

वर्दी
कधीतरी मनाच्या त्या एका कोपर्‍यात
श्वासांची खूप धावपळ सुरु असते,
कोणाची बरं वर्दी असते ही...

उणे.. अधिक एक तिकडे
माझ्या दोन ठोक्यांमधला एक ठोका चुकतो आहे
तिकडे त्याच्या हृदयाचे ठोके वाढताहेत...

फिनीक्स
रोज कितीतरी स्वप्नांची होळी,
होरपळून जीवाची राखराख होतेय.
पण राखेत जगतांना स्वप्नांना
पुन: पंख फुटतात आणि नव्याने ते
तेजाकडे झेपावतात...

फू...
कस सांगू तुला
एक एक दिवस
कसा सरतो
ज्वालामुखीच्या अंगणाला
सारवता सारवता पोळतो

दवडी
उगाच दवडला वेळ
झाकून होती
तरी दवडी रिकामी

मावळत नाहीस
हातात तोडे घातले
पायात जोडवी
नाकात भली मोठी नथ तरी...
श्वासाच्या एका अंतरावर तू
उभा असल्याचं जाणवतं...

नवस
वर लाल रंगाचा चुडा
खाली रक्ताळलेले कुंकू
रक्ताळलेल्या भावनांचे
रक्ताळलेले नवस...

एक दिन
संपूर्ण पानांचं ओझ उतरवून
फक्त आणि फक्त
फुलांनी बहरावं असं झाड
होता यावं ना एक दिन

रसिया
प्रत्येक ऋतूची एक सारखी आठवण
तू त्या ऋतूतही बोलला नाहीस
तू या ऋतूतही अबोल आहेस...रसिया

बेसबब
बारीश की ठिठूरती ठंड से
गिरते पिले पत्ते
बेसबब तुम्हारी याद...
बेबस बिखरे पत्तो तले
दबी हुई है बिखरी सांस......
__________________________

0 Response to "विखुरलेल्या ओळींची काहाणी..."

Post a Comment