एक परिघ...

तो-
...ती दिसायची कायम स्व:तच मशगूल
तिचं असं स्वत: गुंतून राहणं
फार अस्वस्थ करायच मनाला
तिने आपल्याशी बोलावं, आपल्याकडे बघावं,
आपल्यासोबत...
केवढा अट्टहास, केवढा आकांत
या मनाचा त्या मनासाठी
आणि ती मात्र मौन
कमालीची मौन...
खरंतरं तिला ओढायच्या नादात
गच्च ओले कपडे वाळू घातलेल्या दोरीगत
तुटल्या गेलो आपण
आणि सगळी शुभ्रताच हरवली...
किती दिवस, किती रात्र...
किती विनवन्या, किती माफी, किती मनधरणी...
----------

ती-
...आपण कायम आपल्या जागेच्या,
आपल्या जगाच्या शोधात... काय चुकलं??
...
खरंतरं जीवावर आलं होतं निघायला
पण आज नाहीच द्यावासा वाटला नकार
इतक्यांदा नकार दिलाय
आज एका नकारानं दुसर्‍या नकाराला
स्वीकारावं म्हटलं...
तर सालं इथेही जागेचा प्रश्न...
दिसतेय सगळ्या जागा भरल्यात
अगदी आपल्यासाठी राखून ठेवलेली सुध्दा...
...
हुश्श एक जागा रिकामी करुन बसले
पण बोध अपराध अरे रेsss
...
जागा नसल्याची, जागा न मिळल्याची खंत
अजूनही जागी; जागच्या जागी...
----------

आणि तो (त्याचा वयात आलेला मुलगा)
...अरे हीच ती अगदी बाजूलाच बसलीय
हातात पप्पांच पुस्तक
किती कुरवाळतेय त्या पुस्तकाला
त्यालाही असंच कुरवाळलं असतं...???
किती झुरला तो हिच्यासाठी
रात्र रात्र रडला
मला नव्हतंच कळलं काही...
काय सांगणार होतो???
मी फक्त एकूण घेतलं
जसं सांगेल तसं, तितकं, तेवढच
आणि तो शांत झाला
हीनेही ऎकून घेतले असते तर...
----------

समारंभा शेवटी
त्याचा हातात हात घेऊन
ती- अभिनंदन सर...

तो- ...
(अजूनही मनातल्या मनातच)

आणि तो (त्याचा वयात आलेला मुलगा)
...
आता परत यांच्या रात्री माझ्या रात्रीला बिलगून...
__________________________

0 Response to "एक परिघ..."

Post a Comment