कालपासनं माझा पत्ता नाहीये...

एखादं रात्री मन शरीर सोडून निघून जातं
दूसर्‍या दिवशी फक्त श्वासच उठतो
त्यामागे मनाचं मंतरलेपण नसतं
एक शरीर घरभर फिरत असतं
या त्या वस्तुशी धडपडत
धडधड करीत...
त्याच्या ओळखीचं, त्याच्या सरावाचं
काहीच नाही
त्यामुळे ते पडतं, पहुडतं
आखूड लांब श्चास घेतं...
त्याला कोणत्याच कामाशी काही देण-घेण नसतं
बदलेल्या नजरांशी
कपाळावरील आठ्यांशी
कशाशी काही म्हणून नाही
त्याला फक्त जिवंत ठेवायच असतं बस!!!
निकराने जिवाला हवा पुरवायची
एकसारख पंपीग...
उर धपापतोय धापा टाकतोय
पण काय होतेय सांगता येत नाही
...............................
एक ओळखीचा आवाज
येतोय म्हणणारा
आल्यावर अलगद मिठीत घेणारा
आणि म्हणानारा
आज तू नाहीसच

हो कालपासन माझा पत्ता नाहीये...
__________________________

0 Response to "कालपासनं माझा पत्ता नाहीये..."

Post a Comment