एक कलीग...

तिला जेव्हा माझ्याशी
बोलायचं असते
तेव्हा खरंतरं
तिच्या मनात ’तो’ असतो
त्याच्याविषयी
मला काही सांगायचं असते
बोलायचं असते
विचारायचं असते
पण मग स्वत:वरच
रुष्ठ होऊन ती
जाणिवपुर्वक
व्यक्तींची, वस्तूंची माहिती
देत बसते...

-बेल वाजली की,
त्याच्या म्हणून फोन जवळ घेते...
...मॅसेज आला असेल म्हणूनही...
स्क्रीन वरील त्याच्या नसलेल्या
टोपन नावाला कुरवाळत बसते

दिवसातून कितीतरीदा
या फोनच्या स्क्रीनवर
त्याचा फोटो असावा,
त्याचा नंबर त्याचाच
नावाने सेव्ह असावा
असा काहीबाही
विचार करीत...

कॉम्प्युटरवर त्याचे मेल
त्याचा फोटो जपून ठेवलेला
कोणाची चाहूल नसेल
अशा वेळी मन भरून...
उचंबळून रिती होत
की-बोर्डवर
माऊस हातात घेऊन...
परत एक छानशी स्माईल डकवून
कामावर रूजू

एक वेळा तिने विचारलं
होतं म्हणे त्याला
तू नाही का रे व्याकूळ होत माझ्यासाठी
उत्तरदाखलं तिने तिचं जपून
ठेवलेलं हरवलेपण...

तिच्या मनात सतत घालमेल
सुरू असते
ती पीर, बाबा, दर्ग्यावर
आपल्याया न्याय मिळावा म्हणून
गुहार करते
न्याय कोणा पासून कसा...?
कळत नाही
पण तिला तिचा खेळ काही मांडता येत नाही

आजही भेटली
बोलली
खळाळून हसली
आजही तिच्या नजरेतला तो
पापण्यात होता...
तिच्या जिकरीच्या प्रयत्नात
आजही ती
यशस्वी झाली होती
खाली कवितेतून मात्र ओथंबून वाहात होती...
__________________________

0 Response to "एक कलीग..."

Post a Comment